पारोळा येथे प्रांत अधिकाऱ्याचा पाहणी दौरा

0

पारोळा (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरस ने आपल्या लगतच्या अमळनेर , पाचोरा , धुळ्या मध्ये धुमाकूळ घातला असुन दररोज कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने आपले – शहर आपला तालुका आता आपल्यालाच सांभाळ्याचा असुन आता जास्त सतर्क राहण्याची वेळ आली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनो तुम्ही तुमच्या शहरातील वार्डा _ वार्डाच्या सिमा बंद करा आम्ही गांवा- गांवाच्या सिमा बंद करतो असे आव्हान प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले.

येथील तहसिल कार्यालयात  नगराध्यक्ष , नगरसेवक , व मोजक्या व्यापार्यां   ची बैठक आयोजित करण्यात आली होती . त्या वेळी ते बोलत होते . या वेळी तहसिलदार अनिल गवांदे , नगराध्यक्ष करण पवार , शहर तलाठी निशिकांत पाटील , आदि उपस्थीत होते. बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रांत . विनय गोसावी म्हणाले की कोरोना व्हायरस ने हाकेच्या अंतरावर असलेल्या अमळनेर , धुळे , पाचोरा आदि जवळच्या गांवा मध्ये धडक दिली असून दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत आहे तेव्हा आपण आता सावध झालं पाहिजे अमळनेर , धुळे यांच्या सह पारोळ्या कडे येणाऱ्या रस्त्यासह लगत असलेल्या गावा – गावाचे मार्ग लाकडी व बंल्या लावून तर शहरातील नगरसेवकांनी वार्ड – वार्डच्या सिमा बंद कराव्यात म्हणजे आपल्या गावात शहरात कोरोनाचाप्रदुर्भाव होणार नाही आपले शहर व तालुका या पासुन दुर ठेवायचा असेल तर सर्वांनी कामाला लागा असे सांगून आठवड्यातील कोणतेही दोन दिवस व्यापार बंद ठेवा तर भाजी _ पाला ,  फळे व इतर विक्रेत्यांना ग्लोज , मास्क , सॅनिटायझर सक्तीचे करा अन्यथा त्यांना दंड आकारा तसेच सोशल डिस्टांसिंग पाळायला लावा , भाजी पाला विक्रेत्यांना वेळेचे बंधन ठेवा या व अश्या अनेक सुचना त्यांनी बैठकीत केल्या.

मास्क, ग्लोज, सॅनिटायझरचे वाटप करणा ; करण पवार 

शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांची बैठक गेल्या दोन . चार दिवसा पुर्वी झाली होती . त्यात सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत आप- आपले व्यवसाय नियम व अटी पाळून करावे त्याला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे . आता शहरातील भाजी – पाला व किरकोळ विक्रेत्या सह प्रत्येक दुकांन दारांना ग्लोज , मास्क व सॅनिटायझरची वाटप सोमवारी व मंगळवारी करणार असल्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी बैठकीत सांगून आम्ही शहरातील  वार्डा – वार्डाच्या सिमा बंद करतो तुम्ही महामार्ग व अमळनेर रस्त्याच्या सिमा बंद करा तसेच शहरात मोटर सायकल ला बंदी घालणार असुन बाजारात  मोटर सायकल आणणाऱ्यास दंड ठोठवला जाईल , तर आठवडयातुन दोन दिवस बंद (  जनता कर्फ्यू  ) रविवार आणि बुधवार कडकडीत बंद ठेवणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष करण पवार यांनी प्रांत . विनय गोसावी यांना दिली .

प्रांताधिकारी यांनी केली शहराची पायी पाहणी

तहसिल कार्यालयात दुपारी बैठक आटोपून प्राताधिकारी गोसावी, नगराध्यक्ष करण पवार, शहर तलाठी, निशिकांत पाटील,पत्रकार रमेश कुमार जैन, अशोक कुमार लालवानी,यांच्यासह नगरसेवकांनी शहरातील महामार्ग , तलाव गल्ली , नगरपालिका चौक , आठवडे बाजार, बाजार पेठ, गांव होळी चौक, रथ चौक , भाटेवाडी सर्कल , गणपती चौक आदि ठिकाणची पहाणी केली. रविवार  हा पारोळ्याचा आठवडे बाजार असतांनाही व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवल्याने शहरवासियाचे प्रांत यांनी कौतुक केले.

यांची होती बैठकीस उपस्थीती

नगरसेवक दिपक अनुष्ठान, मनिष पाटील, पी . जी  पाटील, बापु महाजन, संजय पाटील, प्रकाश वाणी , नवल चौधरी, प्रकाश महाजन, भावडू राजपुत , गौरव बडगुजर ,प्रकाश महाजन ,  भैय्याचौधरी , कैलास पाटील , महावीर भंडारी , तसेच पत्रकार अभय पाटील, रमेश कुमार जैन, अशोक कुमार लालवानी,संजय पाटील,आदिची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.