पारोळा येथे कापसाच्या मापात पाप : तिघांविरुद्ध गुन्हा

0

पारोळा–प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील मोंढाळे या गावी एका शेतकर्याचा कापुस मोजताना मापात शेतकऱ्याची  फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे,

तालुक्यातील मोंढाळे येथे व्यापारी लहु धुडकु पाटील रा,मोंढाळे प्र,उ,ता, पारोळा व संजय दशरथ वाणी रा डी,डी नगर पारोळा, हे मोंढाळे येथिल शेतकरी विलास पाटील यांनी ५ हजार २०० रूपये क्विंटल या प्रमाणे आपला कापुस सदर व्यापार्यास दिला होता. त्या कापसाचे मोजमाप व्यापार्याचे मापाडी रावण त्रंबक पाटील रा,दळवेल हे मोजमाप करित असताना कापुस भरलेल्या चवळ्याला पायाने घुडगा लावीत असल्याचे शेतकर्याच्या लक्षात आले. या आधी २१ तोल माल मोजला गेला होता तर २२व्या तोलाच्या वेळी ही बाब लक्षात आल्याने शेतकर्यांने ते परत मोजण्याचा आग्रह केला असता मापाड्याने ते मोजण्यास नकार दिला. परंतु शेतकरी आक्रम झाल्याने इतर शेतकरी ही तिथे जमले व सर्वानी तो तोल परत मोजण्याची मागणी केली असता परत मोजल्यावर २ किलो चा फरक आढळुन आला.  आगोदर जे कापुस ४० किलो येत होते.  ते नंतर ४२ किले आले,म्हणजेच एका क्विंटल मागे ५ किलो या प्रमाणे कापसाचे वजन कमी येत होते. हा सर्व प्रकार उपस्थित शेतकर्याच्या लक्षात आल्याने शेतकरी संतप्त झाले,त्यांनी व्यापाऱ्यांसह मापाडीला चांगलाच चोप दिला. यापुर्वी याच व्यापाऱ्याने  गावातील इतर शेतकऱ्यांकडून कापुस खरेदी केला असल्याने त्या शेतकऱ्यांनीही  या व्यापाऱ्याला जाब विचारला असता घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हे वृत्त  पारोळा येथे कळल्याने पारोळा येथिल पोलिस घटनास्थळी दाखल झाले . शेतकरी विलास पाटील यांच्या फिर्यादी वरून पारोळा पोलिस स्टेशनला फसवणुकीचा  गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.