पारोळा बालाजी संस्थांना तर्फे स्तंभरोपण

0

पारोळा (प्रतिनिधी) : बालाजी मंदिरात १५ रोजी सकाळी ६.३० वाजता विधिवत पूजा अर्चा करून स्तंभरोपण करण्यात आले.बालाजी संस्थांना कडून दरवर्षी ब्रह्मोउत्सवा ची सुरुवात मंदिराच्या प्रांगणात स्तंभरोपण करून सुरुवात केली जाते.यावर्षी देखील ब्रह्मोउत्सवाची सुरुवात स्तंभरोपन करून करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरा नुसार घरगुती वातावरणात साजरे करावे लागणार आहेत.

भाविकांची गर्दी न होता हे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. स्तंभरोपन कार्यक्रम देखील फक्त विश्वस्थांच्या उपस्थिती सामाजिक अंतर राखून पार पडला. मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते स्तंभरोपन विधिवत पूजा करून करण्यात आली.यावेळी संस्थानाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले ,विश्वस्त डॉ अनिल गुजराथी ,प्रकाश शिंपी ,संजय कासार ,केशव क्षत्रिय ,दिनेश गुजराथी ,आर्चक संजय पाठक ,सुनील शिंपी ,भटू शिंपी ,संदीप धमके ,अँड दत्ता महाजन ,राजेश पाटील ,शालीक लोहार ,अरुण लोहार ,यांच्या सह स्वयंसेवक ,भालदार चोपदार ,बालाजी भक्त उपस्थित होते.

छाया–पारोळा बालाजी संस्थानात ब्रह्मोउत्सवा सुरुवात स्तंभरोपन करून करण्यात आली स्तंभरोपन करतांना श्रीकांत शिंपी ,रावसाहेब भोसले , प्रकाश शिंपी ,संजय कासार ,अनिल गुजराथी ,केशव क्षत्रिय ,संजय पाठक आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.