पारोळामध्ये बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी

0

पारोळा | प्रतिनिधी

कोरोना वायरस चा वाढता धोका लक्षात घेता, पारोळा येथे बाहेरगावाहून आलेल्या नागरिक व विद्यार्थी यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरी पाठविले जात आहे, यात ताप मोजणी, श्वास घेण्यास त्रास आहे का आदी प्राथमिक तपासण्या करण्यात येत आहे, मुंबई पुणे दुबई येथुन अनेक जण पारोळा येथे परतले आहेत त्या सर्वांना तपासणी करून मगच घरी पाठवण्यात आले आहे यात एक ही रूग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश सांळुखे यांनी दिली आहे,
दहा बेड चे कोरोना वाॅर्ड, डॉ, सांळुखे

तसेच पारोळा येथे कुटीर रूग्णालयात अतिदक्षता म्हणून दहा बेड चे आयोसोलेटेड कोरोना वाॅर्ड तयार करण्यात आले आहे, बाहेरून आलेल्या नागरिक व विद्यार्थी यांची तपासणी करून कोरोना बाबत काही लक्षणे दिसल्यास त्यांना पुढील तपासणी साठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे, पारोळा येथे व्हेंटिलेटर सह पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नाही ,तालुक्यात परदेशातून आता पर्यंत ४ नागरिक आले आहेत फिलीपींस वरून एक तर दुबईहून एका जणाचा समावेश आहे, हे टोळी, करमाड व तामसवाडी येथिल रहिवासी असल्याचे समजले आहे याना तपासणी करून त्यांच्या च घरात चौदा दिवस एकांतात राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्या चे सांगण्यात आले आहे, तसेच यांच्या वर प्रशासन नजर ठेवून आहे, या सर्व गोष्टी वर पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ, योगेश सांळुखे, डॉ, निखिल बोहरा, डॉ, नईम बेग, हे रात्रंदिवस नजर ठेवून आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.