पाचोऱ्यात ४ रोजी श्री. श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

0

पाचोरा – अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ – श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, सद्गुरू प. पु. मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट यांचे अंतर्गत दि. ४ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण व सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आलै आहे.

या शिबिरात तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाने हद्यविकार, मधुमेह (डायबिटीस), सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्यांचे विकार, त्वचा विकार, वात विकार, पोटांचे विकार, दात विकार, महिलांचे विकार, मुतखडा, मुळव्याध, काविळ, लहान मुलांचे विकार, मनोविकार सह अनेक व्याधींचे निदान केले जाणार आहे. या मोफत आरोग्य शिबीरात नाव नोंदणीसाठी डॉ. विजय आर. ढवळे (मो.क्रं. ८७६६४६०१२०) व विकास गोपाळ पाटील (कडे वडगांव) मो. क्रं. ८२७५२५७५९६ यांचेशी संपर्क साधावा. तसेच सेवेकरी व नागरिकांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित), संघवी काॅलनी, पाचोरा चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.