पाचोऱ्यात संत सावता महाराज पुण्यतिथी जल्लोषात साजरी

0

 पाचोरा (प्रतिनिधी) –  दि.३१ रोजी सकाळी ८.०० वा. समाज कार्यालयावर संत सावता माळी मंदिरात मूर्ती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीला कोंडवाडा गल्ली येथून सुरुवात झाली. पुढे जुने विठ्ठल मंदिर, देशमुखवाडी, बाहेरपुरा, कृष्णापुरी या मार्गे नवीन विठ्ठल मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. तसेच पालखी मिरवणुकीत भाविक भक्तांना अल्पोहार, चहा सेवा करणारे प्रल्हाद देवचंद महाजन,भरत जगन्नाथ चौधरी, मधुकर रामदास महाजन यांच्या सौजन्याने वाटप झाले. तसेच कृष्णापुरी भागातील संत तुकाराम महाराज बीज उत्सव समिती तर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम झाला. बाजीराव सयाजी महाजन यांच्या निवासस्थानी अल्पोहाराचे वाटप झाले.

पालखी मिरवणुकीत पी.टी.सी. चेअरमन संजय वाघ, युवानेते अमोल शिंदे यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत विविध सामाजिक, राजकीय व्यक्तींनी आपली उपस्थिती दिली.

दुपारी १२.०० वाजेपासून नवीन विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाला सुरुवात झाली. सर्व बहुजन समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच दि. २४ पासून सुरु असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताहाची ह.भ.प.पांडुरंग महाराज यांच्या कालाच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.

संत सावता महाराज पुण्यतिथी मिरवणुकीत पाचोरा पंचक्रोशीतील भजनी मंडळी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच माळी समाजातील सर्व महिला व पुरुषांनी विशेष गणवेश परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आठवड्याभरा पासून सुरु असलेल्या या विविध कार्यक्रमासाठी पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष महाजन, सचिव गजानन महाजन, उपाध्यक्ष मयूर महाजन, बंटी महाजन, शंकर  महाजन, सहसचिव नाना महाजन, कोषाध्यक्ष चिंधू मोकळ, जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाजन, सुनिल महाजन, कन्हैय्या देवरे, शुभम महाजन, प्रदीप महाजन, शरद गीते, बबलू महाजन, नथ्थु महाजन, अनिल बागुल,नामदेव महाजन, अनिल महाजन, गजानन महाजन, भाऊसाहेब महाजन, मधुकर महाजन, श्रीराम  महाले, संदीप पाटील, ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक वासुदेव महाजन,भास्कर महाजन, मधुकर महाजन, सुनील उमाळे, दिलीप रोकडे, प्रमोद महाजन सह समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.