पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कडकडीत बंद

0

पाचोरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईडीने चौकशी सुरू केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटत असल्याने या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे माजी आमदार दिलीप वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर व्यापारी बांधवांनी स्वयंमस्फुर्तीने व कडकडीत बंद पाळला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौकातून रेल्वेस्टेशन रोड देशमुखवाडी, गांधीचौक, सराफ बाजार, जामनेर रोड, एस. टी. स्टॅंडरोड, शिवाजी नगर, बाहेरपूरा, आठवडे बाजार, भडगाव रोड परीसरात फिरुन व्यापाऱ्यांना व्यव्हार बंद ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरपरीषदेचे गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भुषण वाघ, सुचेता वाघ, सरला पाटील, जयश्री मिस्तरी, अजहर खान, शशिकांत चंदिले, भगावन मिस्तरी, शरद पाटील, बंटी महाजन, हरुण देशमुख, शेख रसूल शेख उस्मान,फयीम शेख, प्रकाश पाटील, बशीर बागवान सह मोठ्या संख्येने पदाधिकारी सामिल झाले होते. आवाहनानंतर दिलीप वाघ, नितीन तावडे, संजय वाघ, विजय पाटील, विकास पाटील, वासुदेव महाजन भुषण वाघ, सतिष चौधरी अजहर खान बसीर बागवान यांनी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. दुपारी तीन वाजेनंतर व्यवहार सुरळीत झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.