पाचोरा येथे नगरपालिकेतर्फे न.पा.क्षेत्रातील नागरीकांची आरोग्‍य तपासणी सुरु

0

पाचोरा (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत महाराष्‍ट्र शासनाने दि. ३० जुन २०२० पावेतो लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्‍यात आलेला आहे. शहरातील दिवसेंदिवस रुग्‍णसंख्‍या वाढत असून नागरीक स्‍वतःहुन तपासणीकरीता पुढे येत नसल्‍याने जिल्‍हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानूसार पाचोरा नगर पालिकेने दिनांक २८ मे २०२० पासून संपुर्ण शहरातील नागरिकांची थर्मल मशिन व्दारे प्रत्येकांचे घरो – घरी जाऊन प्रत्येक नागरिकांचे इन्फ्रेड थर्मोमिटर द्वारे तापमान तपासणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, ज्या नागरिकांना जास्त ताप असल्यास त्यांचे नांवे नोंद करून पुढील तपासणी साठी सरकारी दवाखान्यात नावे पाठविणे, तसेच कोणत्याही नागरिकांस कोरोना संबंधित लक्षणे आढळून आल्यास त्यांची देखील नोंदी ठेवणे, इ.काम सुरु आहे.

आजपावेतो ५९६०९ लोकसंख्येपैकी कंटेन्मेंट झोन मधील १३ हजार ५०० नागरिकांची कंटेन्मेंट झोन वगळता २९ हजार ६०१ नागरिकांची, ६० वर्षावरील २ हजार १११ नागरिकांची अशी एकूण ४३ हजार १०१ नागरिकांची तपासणी झालेली पूर्ण आहे. सदरचे सर्वेक्षण मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांच्या मार्गदर्शनानूसार सुरु असून याकामी नागरिकांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. सदरच्‍या सर्वेक्षण कर्मचा-यांवर प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे हे नियंत्रण ठेवत असून कर्मचा-यांमध्‍ये पांडुरंग धनगर, शाम ढवळे, ललित सोनार, भिकन गायकवाड, हिम्‍मत महाजन, संदिप जगताप, मजीत पिंजारी, अर्जुन सुर्यवंशी, सुभाष बागुल, नाना धनगर, शरीफ खान, विक्रम कंडारे, दिपक बनसोडे, सुनील धनगर, अमोल अहिरे, गजानन पाटील, प्रकाश लहासे, विनोद सोनवणे, नरेश आदीवाल, विठ्ठल पाटील, प्रशांत कंडारे, शरद नागणे, विलास कुलकर्णी तसेच उपशिक्षकांमध्‍ये मयुरेश राजेंद्र देवरे, विजय प्रकाश पाटील, चंद्रकांत प्रकाश पाटील, सागर सुरेश पाटील, संदीप भिकन मनोरे, रविंद्र संतोष जाधव, सागर देविदास थोरात, प्रशांत सुभाष पाटील, प्रशांत पंडीत नैनाव, रविंद्र अशोक पाटील आदी अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.