पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  येथील भडगांव रोडवरील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल मध्ये नुकतेच मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये  ४०० रुग्णांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. यात वृध्द, महिला व बालकांची मोफत तपासणी करण्यात आली.

यावेळी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने मधुमेह, हिमोग्लोबिन, फुफ्फुस रोग, नेत्ररोग, दमा, किडणी, संधिवात, यकृत, रक्तदाब या महत्त्वाच्या तपासण्यांसह गरजु रुग्णांचे ई.सी.जी. काढण्यात आले. यातील काही रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली. दगदगीच्या जीवनात आरोग्य जोपसण्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. तर काही रुग्ण आर्थिक विवंचनेने त्रासले असल्यामुळे ही आजारपण अंगावर काढतात. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. दिवसभर चाललेल्या या आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी दिपक पाटील गौरव चौधरी, शरद मराठे सह हाॅस्पिटलच्या टिमने परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.