पाचोरा येथील वायरमनाचा उपचारा दरम्यान मृत्यु

0

पाचोरा | प्रतिनिधी 

पाचोरा येथील लक्ष्मीबाई नगरातील रहिवासी व भडगाव येथे कार्यरत असलेले पवन वसंत चनाडे हे दिनांक २३ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान भडगावहून येत असतांना हॉटेल दाजीबा जवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात कारने समोरुन ठोकल्याने त्यांना जबर मार लागला होता. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना पवन चनाडे यांची दिनांक ३० रोजी दुपारी ४:३० वाजता प्राणज्योत मालवली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनावर अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे व हवालदार हंसराज मोरे हे करीत आहेत. मयत चनाडे यांचेवर रात्री उशिरा पाचोरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पाच्छात दोन भाऊ दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.