पाचोरा नगरपालिकेच्या विषय सभापती पदांची नियुक्ती

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  दि.९ रोजी तहसिलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा नगर परिषद विषय समितींच्या सभापतींची निवड करण्यात आली असुन पुढील विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत केले. नगरसेवक उपस्थित होते. सभेत नगराध्यक्ष संजय गोहील, उपाध्यक्ष शरद पाटे, परिविक्षाधीन मुख्याधिकारी पवन पाटील, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सभा लिपीक, राजेंद्र शिंपी, भांडार विभागाचे ललित सोनार, किशोर मराठे, आकाश खैरनार आदी कर्मचारी उपस्थित होते.

दि. १ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेनुसार स्थायी समिती सदस्य म्हणून अनुक्रमे  सुनिता किशोर पाटील, संजय ओंकार वाघ, प्रियंका वाल्मिक पाटील यांची निवड करण्‍यात आलेली आहे.

निवड झालेले सभापती

नियोजन व विकास समिती – शरद बाळकृष्‍ण पाटे (पदसिध्‍द सभापती)
सार्वजनीक बांधकाम समिती –  सतिष पुंडलीक चेडे
शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती  महेश प्रकाशराव सोमवंशी
स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजणिक आरोग्य समिती –  वासूदेव भिवसन माळी
पाणीपुरवठा आणि जलनिसा:रण समिती-  विकास संतोष पाटील
महिला व बालकल्याण समिती – सईदाबी शब्‍बीर खान
वरील प्रमाणे समित्यांचे सभापती म्हणुन बिनविरोध निवडुन आल्याचे तहसिलदार यांनी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.