पाकिस्तानातून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे आंदोलन

0

जळगाव ;– भाजप सरकारने पाकिस्थानातून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे आज नागरिकांना साखर वाटप करून शिवतीर्थ मैदानासमोर आंदोलन करण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील , जिल्हा सचिव गौरव वाणी , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांनी निषेध व्यक्त केला . कल्पिता पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि , केंद्र सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली . मात्र असे असताना भारतीय नागरिक व सैनिकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे .

दाऊदला परत आणण्याची भाषा पंतप्रधानांनी करून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत . खासदार राजू शेट्टी देखील गायब आहेत . माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सातत्याने साखर उद्योग अडचणीत असल्याचे सांगत आले आहेत . मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष करत साखर आयात करून शेतकरी,साखर उद्योगाला अडचणीच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे . राष्ट्रवादीतर्फे याचा निषेध करून आंदोलन करण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.