पक्षांतर्गत षढयंत्राचा बळी ठरलो, उद्या मेळाव्यात भूमिका ठरवणार

0

खा. ए.टी. पाटील यांची पत्रकार परिषेदेत माहिती

पारोळा,-
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने चांगली कामे करीत होतो चार लाख मताधिक्याने मागील वेळेस निवडून आलो तरी देखील माझे तिकीट कापले गेले यात आमच्याच पक्षातील काही हुशार मंडळींच्या कारस्थानमुळे बळी झालो असे खासदार ए टी पाटील यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले
आज पारोळा येथील खासदार ए टी पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी खासदार ए टी पाटील, अमळनेरचे माजी आमदार बी एस पाटील, भाजप जिल्हा कोषाअध्यक्ष सुरेंद्र बोहरा, तालुका अध्यक्ष अँड अतुल मोरे शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार पाटील पुढे म्हणाले की पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे परंतू मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी याबाबतीत प्रचंड नाराज आहे म्हणूंन कार्यकर्त्यांनीच दि 26 रोजी पारोळा येथील बालाजी महाराज मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्याचा मेळावा घेणार आहे यात कार्यकर्त्यांशी हितगुंज करून संवाद साधून आपण आपली पुढील भूमिका त्याच दिवशी भाषणातून सांगू असे सांगितले
गेल्या दोन वर्षांपूर्वी आपणच पुढील खासदारकीचा उमेदवार असणार आहे याची कल्पना दिली होती त्याप्रमाणेच त्यांनी दोन वर्षांपासून कमला लागले होते महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होऊन देखील मला डावलण्यात आले माझे तिकीट कापण्याचे कारण मात्र अजून मला समजले नाही, पक्षानेही देखील स्पष्ट केले नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे जिल्ह्यात काही मंडळी हुशार आहे त्यांना कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही आणि मग अश्या पद्धतीने ( तिकीट कापून) मागे खेचण्याचे काम करतात, संघ परिवार देखील माझ्यासोबतच होता पण असे का झाले हे मला सांगता येणार नाही असे सांगितले
* आपल्याकडे स्मिता ताई आल्या होत्या का ?
खा पाटील- हो आल्या होत्या काल सायंकाळी आल्या होत्या पंधरा ते विस मिनिटे बसल्या त्यांची सांगितले की आम्हाला सहकार्य करा एवढीच चर्चा झाली
*आपले काही समर्थक नाथाभाऊंच्या भेटीला गेले होते, व स्मिता ताईंच्या विरोधात घोषणा दिल्या अशी चर्चा आहे ?
खा पाटील – हो गेले होते परंतू घोषणा वैगरे काहीच दिल्या नाही ते तिकीट कसे कापले गेले या संदर्भत चर्चा केली

यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील म्हणाले की नानासारखे सक्षम खासदारांचे तिकीट कापले गेले याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली याबाबत आम्ही जिल्हा कमिटी व वारिष्टाशी चर्चा करणार आहोत अजूनही वेळ गेलेली नाही जसे क्रिकेटच्या शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच असते तसेच राजकारणात देखील शेवटच्या क्षनानपर्यंत काहीही होऊ शकते असे सांगितले
यावेळी तालुका अध्यक्ष अतुल मोरे म्हणाले की सच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही उद्या महाराष्ट्राचे संघटन मंत्री पुराणिक साहेब येत आहे त्यांना याबाबतीत कैफियत मांडणार आहे नाना हे यावेळेस हॅट्रिक साधणार होते म्हणून त्यांचे तिकीट कापले असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.