पं.स.उपसभापती भिकेश पाटील यांच्या निधीतून शवपेट्या वितरण

0

अमळनेर (प्रतिनिधी):-मुडी गणाचे पंचायत समिती सदस्य व उपसभापती भिकेश पाटील यांच्या पंचायत समिती स्थर वाढीव उपकर योजनेअंतर्गत मुडी गणातील ४ गावांना आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते शवपेट्या वितरण करण्यात आल्या.

ग्रामीण भागात मयत झाल्यावर मृत इसमाचे प्रेत बॅक्टेरियांमुळे खराब होऊ नये व संसर्गापासून सुरक्षित राहावे यासाठी ग्रामीण भागात शवपेट्या उपलब्ध नसतात त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक शवपेट्या शहरातून नेतात त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व जनतेला स्थानिक पातळीवर सोय व्हावी या उदात्त हेतूने आपल्या मतदारसंघात पाच स्थानिक गावांना शवपेट्या उपलब्ध व्हावी म्हणून तालुक्यातील पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील यांच्या निधीतून भरवस,एकलहरे, भिलाली,बाम्हणे, बोदर्डे या गावासाठी शवपेटी वाटप करताना यावेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक,माजी मंत्री व आमदार गिरीषभाऊ महाजन,राज्य जन जातीय क्षेत्र संपर्क प्रमुख ॲड. किशोरजी काळकर, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे,खासदार उन्मेष दादा पाटील,मा.आ स्मिताताई वाघ,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील शहराध्यक्ष उमेश वाल्हे,पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल पाटील,ॲड. ललिताताई पाटील,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राहुल पाटील,राकेश पाटील,विजय राजपूत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.