पंचायत राज समिती आली; पण आदिवासी भागात दौऱ्यासाठी गेलीच नाही..

0

चोपडा, (मिलिंद सोनवणे) लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंचायत राज समितीचा दौरा होणार आहे. म्हणून तब्बल एक महिन्यापासून पंचायत समितीच्या सर्वच इमारती आणि कार्यालयास रंगरंगोटी करण्यात आली असुन पंचायत समितीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. सर्वच दरवाजे खिड़की पासून ते सर्वच खिडक्यांचे तावदान, नवीन करकरीत पड़दे लावण्यात आले असुन, बाहेर ही छान सुंदर रंगोळी काढून सजावट करण्यात आली होती.

या समितीचे सदस्य, अध्यक्ष साडे बारा वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील निमगव्हान येथील आरोग्य उप केंद्राला आणि जि.प.च्या शाळेला भेट दिली तेथील एक ते दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्रवाई केली असल्याची चर्चा काल दिवसभर जोर धरत होती.

पंचायत समिती येथे या  टीमचे स्वागत पदाधिकारी आणि अधिकारी यांनी केले. त्यानंतर पं.स.च्या हॉलमधे सर्वच विभागाच्या अधिकारी वर्गाची झाडाझडती घेवून कसून सर्व माहिती घेण्यात आली. यावेळी सर्वच कर्मचारी आणि अधिकारी सज्ज व सुटा बुटात होते. केव्हा कोणत्या विभागाची चौकशी होईल आणि कोण दोषी आढळेल हिच चिंता सर्वाना सतावत होती.

 समिती आली,  पण तर ठिकाणी आदिवासी भागात गेलेच नाहीत.. 

चोपडा तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी समाज आणि त्यांच्या समस्या ह्या भरपूर आहेत. ग्रामिण भागातील समस्या ख़ुप आहेत. त्यात रेशन, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, रस्ते गटारी, आणि गरोदर माता, त्यांना मिळणारा आहार, कुपोषण या  गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष्य देणे खूप महत्वाचे असुन या समितीच्या सदस्यांनी आदिवासी भागात जावून त्यांच्या खऱ्या खुऱ्या समस्या बघितल्या पाहिजे होत्या. जाणून घ्यायला हव्या होत्या, पण तसे न झाल्याने सर्वच मुजोर अधिकारी कर्मचारी यांनी सुटकेचा स्वास घेतल्याचे दिसून आले.

खरा उद्देश एकच असतो तो असा की, शासनाच्या योजना त्या लाभार्त्यापर्यन्त पोहोचतात की नाही. आश्रम शाळेतील विद्यार्थी कसे शिक्षण घेतात, तेथे मुख्याध्यापक अधिक्षक,कर्मचारी रात्री थांबतात की नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी रात्रीच्या वेळेस आरोग्य सेवा देतात की नाही. निवासी कर्मचारी तेथे चोवीस तास थांबतात की नाही. ह्या गोष्टीकडे  प्रामुख्याने या कमेटीने लक्ष्य देणे अतिमहत्वपूर्ण होते आणि तेच नेमके सुटले.

 अरुणभाई गुजराथी यांच्या घरी दिली पंचायत राज समितीच्या टीमने भेट 

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या निवासस्थानी पीआरसी च्या सर्वच अधिकारी, आमदार महोदयानी जावून सदस्यांची भेट घेतली. गुजराथी हे शरद पवार साहेबांचे निकटवर्तीय आहेत. महाराष्ट्रात आज ही त्यांचा दबदबा कायम आहे. निष्कलंक अस व्यक्तीमत्व असणारे गुजराथी यांचा शब्द आज ही विरोधक असो की शासक हे मानतात.म्हणून चोपडा येथे आले आणि अरुणभाई गुजराथी यांची भेट घेतली नाही अस होवूच शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.