नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये भरपाई द्या !

0

आ.किशोर पाटलांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भडगाव – तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये भरपाई देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना दिले.

भडगाव तालुक्यात 11 जुनला वादळी पावसाने साडेतिनशे हेक्टरवरील केळीसह आदि पीके आडवी पडले होते. कृषी व महसुल विभागा ने एकत्रितरित्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्याना शासनाच्या नियमानुसार हेक्टरी साडेतेरा हजार रूपये अनुदान मिळणार आहे. दुसरीकडे शेतकर्याचा हेक्टरी दीड ते दोन लाख रूपये खर्च झालेला आहे. त्यामुळे शासनाकडुन  मिळणारी मदत अगदि खुपच कमी होणार  आहे.

त्याअनुशंगाने आज आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह , कृषीमंत्री अनिल बोंडे, मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्याचा केळी वर हेक्टरी दिड ते दोन रूपयापर्यंत खर्च आहे. मात्र शासानाच्या नियमानुसार त्यांना अवघे साडेतेरा हजार रूपये मिळणार आहे. त्यामुळे भडगाव तालुक्यातील नुकसान भरपाई पाहता शेतकर्याना किमान  हेक्टरी दिड लाख रूपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यानी सकारात्मकता  दर्शवल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.  दरम्यान आमदार किशोर पाटील यांच्या पत्रानुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्र्याना शेतकर्याना मदतदेण्याबाबत आदेश  काढण्याबाबत विनंती केली आहे. तर उद्या आपण याबाबत विधानसभेतही मागणी करणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

आमदारांच्या मागणीची दखल
गेल्या अधिवेशनात आमदार किशोर पाटील यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ शेतकर्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ मिळावा अशी मागणी केली होती. या विम्याचा ज्याच्या नावावर शेती आहे त्यांनाच लाभ मिळायचा.  मात्र आता बजेट मधे या विम्याची व्याप्ती वाढवून शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अपघात विम्याचा लाभ मिळण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे मागणीची दखल घेतल्याचे मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले. अनेकांना शेतकरी असतांनाही केवळ  जमीन नावावर नसल्याने लाभापासुन वंचीत राहवे लागत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.