निवडणूकीत विजयी झालेल्या नवऱ्याची चक्क बायकोने काढली खांद्यावरुन मिरवणूक

0

पुणे | ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष केला. या जल्लोषाचे अनेक फोटो, व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळाले. पण एक अनोखा फोटो आमच्यापर्यंत पोहचाला आहे. यामध्ये निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवाराला चक्क त्यांच्या पत्नीने खांद्यावर घेतले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील या सामान्य फोटोतील भावना शब्दात मांडता येणार नाहीत.

 

माझा कारभारी लय भारी! असचं या फोटोसाठी म्हणावे लागेल. हा फोटो आहे खेड तालुक्यातील पाळू या ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचा आहे. ग्रामपंचायत निवडणूकीतील यशानंतर गावामध्ये विजयी उमेदवार संतोष गुरव यांना त्यांच्या पत्नी रेणुका यांनी खांद्यावर घेतले आहे. या फोटोत रेणुका या त्यांना खांद्यावर घेऊन चालताना दिसत  आहेत. रेणुका यांच्या चेहऱ्यावर पतीच्या विजयाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

 

दरम्यान, गावगाड्याच्या निवडणूक रिंगणात नशिब आजमावणाऱ्या गाव पुढाऱ्यांना जय-पराजय पाहायला मिळाला. यानंतर कार्येकर्ते आणि उमेदवारांचा तालुक्यापासून गावापर्यंतचा विजयी जल्लोष पाहायला मिळाला. गुलाल,मोटारसायकल, कार रॅली हे तर सोबत असतेच. कार्यकर्ते विजयी उमेदवार किंवा किंगमेकरला खांद्यावर घेत असताता. पण खेड तालुक्यातील या फोटोला वेगळेपण आहे.

 

 

पंचायत राज मधील शेवटचा स्तरावरील निवडणूक प्रक्रिया म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक म्हणता येईल. ग्रामीण भागातील नागरीकांच्या भाव-भावनांशी या निवडणूकाचा थेट संबध येतो. आर्थिक आणि सामाजिक जीवनावर याचा परिणाम होत असतो. गावाच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायतीच्या पुढाऱ्यांनी गाव म्हणजे आपलं कुटुंब असं समजून काम करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.