निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज !

0

पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची माहिती

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव विधानसभा (017) सन 2019 साठी होणाऱ्या निवडणूकीसाठी दि २१ सप्टेंबरपासून आदर्श आचार संहिता लागू झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 4/10/2019 असून दिनांक 5/10/2019 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी आहे तर दिनांक 7/10/2019 हा दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा असून दि 21/10/2019 या दिवशी एकूण 340444 एव्हढे मतदार आपला मताधिकार बजवणार आहेत त्यात पुरुष 180526 व स्त्रीया 15900 तृतीयपंथी 18 त्यात  सैनिक मतदार 1649 पुरुष 1620 स्रिया 29 अशी राहील त्या अगोदर प्रशासना कडून मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे, तर 24/10/2019 रोजी मतमोजणी होणार असून एकूण 341 मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बाबत आयोगाची भूमिका उपस्थितांना विहीत केली तसेच कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण त्वरेने करण्यात येईल असेही सांगितले शासकीय तसेच सार्वजनिक जागेवर असलेले राजकीय पक्ष अथवा पदाधिकारी यांची जाहिरात /फोटो /फ्लेक्स/ बॅनर/ होल्डिंग असलेले आगामी 24 ते 72 तासात काढले जातील तसे विविध शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना सांगितले असल्याचे देखील सांगितले. ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रचार-प्रसारासाठी दोन वाहने जनजागृती सुरू असून यापुढे SVEEP अंतर्गत जनजागृती केली जाणार आहे यावेळी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.