निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस मद्य व ताडी विक्री बंद

0

भुसावळ दि 31 –
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात 23 एप्रिल 2019 रोजी निवडणुका संपन्न होत आहे .या निवडणुकी शांततेने पार पडाव्यात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्ह्यातील निवडणुकींचा कार्यक्रम सुरळीत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मद्य व ताडी विक्रीची दुकाने दिनांक 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2019 दरम्यान (तीन दिवस ) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधितांना दिले आहे .
दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते मतदान संपण्याच्या 48 तास पर्यंत पूर्ण तसेच दिनांक 22 एप्रिल रोजी पूर्ण दिवस आणि दिनांक 23 एप्रिल मतदानाचे दिवशी संध्याकाळी 5. 30 वाजपर्यंत अथवा मतदान संपेपर्यंत मद्य व ताडी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावी . तसेच मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी मतमोजणी संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावी . दिनांक 21 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान ज्या मद्य व ताडी विक्रेत्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.