निंभोरासिम येथे दरड कोसळुन दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

0

रावेर । तालुक्यातील निंभोरासिम येथे दरड कोसळुन दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. तसेच या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दीपक सवर्णे (वय-२०) आणि सुषानंद सोपन पाटील (वय-२२ रा. नायगाव) असे मृत तरुणांचे नाव आहे. तर समाधान मरु कोळी (वय-20 रा. नायगाव) हे गंभीर जखमी झाले आहे.

निंभोरासिम विटवा रस्त्यावरील गट नंबर 46वरील शासकीय बरर्डीवर येथे बक-या चारण्यासाठी गेले असतांना अचानक वरुन दरड कोसळली. यात दीपक सवर्णे व सुषानंद  पाटील हे दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे तर समाधान कोळी हा गंभीर जखमी झाला असून त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तींचा कुटुंबांनी रुग्णालयात एकच आक्रोश केलाय. यावेळी गावकरांनी देखील प्रचंड गर्दी केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.