निंभोरासिम येथे अंत्ययात्रेत सहभागी २७ जणांवर गुन्हा

0

रावेर : तालुक्यातील निंभोरासिम येथे २४ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मृताच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नातेवाइकांसह २७ जणांवर निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
निंभोरासिम येथील ५२ वर्षीय प्रौढाला ताप आल्याने २३ मे राेजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोरोनाचे लक्षणे दिसल्याने स्वॅब घेऊन मुक्ताईनगरातून जळगावला घेऊन जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह थेट निंभोरासिम येथे आणला. तसेच अंघोळ घालून नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात अाले. त्यानंतर मृत प्रौढाचा अहवाल पॉझिटिव्ह अाला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी ६१ जणांना रावेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात अाले अाहे.

निंभोरसिमचे ग्रामसेवक कैलास भगत यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात कलम १८८, २६९, २७०, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १९५१ चे कलम ३७(१) (३) चे उल्लंघन केल्याने कलम १३५ प्रमाणे २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.