‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, भाजपाचं नुकसान होईल असं ते काहीही करणार नाहीत ; चंद्रकांत पाटील

0

पुणे । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला अप्रत्यक्षपणे संमती दिली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.एकनाथ खडसे नाराज असल्यानेचं भाजपच्या कार्यक्रमांना अनुपस्थित असतात का? असं विचारण्यात आलं असता प्रदेश कार्यकारिणीला ते दिवसभर उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच गेले असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.