नाथाभाऊच्या जाण्याने भाजप पक्ष थांबणार नाही ; रावसाहेब दानवे

0

औरंगाबाद:  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांच्या जाण्याने महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही, असे वक्तव्य दानवे यांनी केले.अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचं काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही.

 

निसर्गाला पोकळी मान्य नसते. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. नेता हा अशा कार्यकर्त्यांमुळेच मोठा होतो. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वाची उणीव जाणवणार नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.  आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

 

काही वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचं कसं होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपमध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंत कोण?, असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने भाजप पक्ष थांबलेला नाही. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष कधीच थांबत नाही. भाजपकडे असंख्य कार्यकर्त्यांची फळी असल्याने नेतृत्त्वाची ही पोकळी भरुन निघेल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.