नागरिक संशोधन कायद्याच्या विरोधात मुक्ताईनगरात मोर्चा

0

मुक्ताईनगर : येथील मुस्लीम समाज तर्फे शहरातील जामा मस्जिद पासून तहसील कार्यालय वर महा मूक मोर्चा काळण्यात आला. मोर्चेमध्ये मुक्ताईनगर सहित तालुक्यातील हजारोच्या संख्येने लोक सहभाग होते. यावेळी तहसिलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आला व सदर मोर्चेला बहुजन क्रांती मोर्चा व संविधान बचाओ देश बचाओ या संघटना व तालुका नेशनल कॉंग्रेस तर्फे जहीर पाठिंबा देण्यात आला.

सदर मोर्चे मध्ये केंद्र सरकार मुर्दाबाद* , एन.आर.सी नही रोजगार चाहिए , सी.ए.बी.नही रोजगार चाहिए , ये बिल वापस लो ,असे अनेक सरकार विरुध्द घोषणा देन्यात आले व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ची प्रत फाडन्यात आली,सदर निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत  मा.पंतप्रधान साहेब याना देण्यात आले की,भारतात नागरी बदल कायदा अर्थात (C.A.B) हा कायदा नागरी दुरुस्ती विधेयक 2019 सी.ए.बी (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) तुमच्या मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे, कारण या विधेयक मुळे देशातील नागरिकांसाठी विशेषत: मुस्लिम समाजातील पुढील कारणांमुळे बरेच अस्वस्थता आहे.हे विधेयक घटनेच्या कलम 14 च्या मूळ भावनेच्या विरोधात आहे, ज्यात देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आले आहेत.व या विधेयकाद्वारे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, वगैरा येथून भारतात आलेल्या मुस्लिम, हिंदू, जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन वगळता उर्वरित समाजाला नागरिकत्व मिळेल.व नागरिक दुरुस्ती विधेयक2019 सी.ए.बी (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) बाहेरील देशांतील लोकांना भारतात येण्यास आणि नागरिकत्व मिळविण्यास प्रोत्साहित करते व नागरी दुरुस्तीच्या भावनेला आमचा विरोध आहे जर सी.ए.बी (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) आणि एन, आर, सी विधेयक मंजूर झाले तर संपूर्ण देशात प्रचंड अराजक होईल आणि यामुळे देशाचे मोठे नुकसान होईल व या नुकसाना ची सर्व जबाबदारी सत्ता मध्ये असलेले पक्षा ची राहील तरी मा.पंतप्रधान साहेब, आज आम्ही सर्वजण आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो की नागरिकता दुरुस्ती विधेयक, नागरिक सुधारणा विधेयक 2019 तत्काळ मागे घ्यावे.

यांची होती उपस्थिती 

आमीर साहेब(माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष) हकीम आर चौधरी(मण्यार बिरादरी जळगाव जिल्हा उपध्यक्ष)डॉ.जगदीश पाटील,आत्माराम जाधव(तालुका अध्यक्ष),जाफर अली,आसिफ खान,बहुजन क्रान्ति मोर्चा चे जिल्हा संयोजक,राजू खरे सर,व नितीन गाळे,अफसर खान,जाफर अली,शकूर जमादार,शकील सर,आसिफ खान,शकील मेंबर,मुशीर मण्यार,रौफ खान,युनूस खान,आरिफ आजाद,मस्तान कुरेशी,अहेमद ठेकेदार,व मुक्ताईनगर शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना तसेच अल्तमश तालिब सर,नाजीम सर,मोर्चा यशस्वी साठी जूबेर अली,अकिल शेख,रिजवान चौधरी,इरफान बागवान,सादिक खाटीक,जकीर जमादार,इम्रान खान,दाऊद खान, यांनी प्रयत्न केले व सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.