नागपूरमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा ; काय सुरु काय बंद?

0

नागपूर : नागपूरमध्ये मागील गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून नागपूरमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

आम्हाला आता कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.

मिनी लॉकडाऊनचा परिणाम नाही

नागपूर शहरात 14 तारखे पर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं.   शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले मात्र रस्त्यावर विना कामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?

– मद्य विक्री बंद

– डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु

– लसीकरण सुरु राहणार

– खासगी कंपन्या  बंद, सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार

Leave A Reply

Your email address will not be published.