नव्या पालकमंत्र्याकडून स्वप्नपूर्तीच्या अपेक्षा

0

शेवटच्या चार- पाच महिन्यांसाठी का असेना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली. ही नियुक्ती यापुर्वीच होणे अपेक्षित होते तथापि माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचेतील तणावाचे संबंध पहाता वाद वाढू नये म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवले गेले. चंद्रकांत पाटील यांचेकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी तसेच सार्वजनिक बांधकाम व्यतिरिक्त महसूल, कृषी या खात्याची अतिरिक्त जबाबदारी असल्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी त्यांना वेळच मिळत  नव्हता. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दोन- दोन महिने जिल्ह्यात फिरकत नव्हते. त्यामुळे विकास कामाचा पाठपुरावा होत नसल्याने कामे ठप्प पहली. पालकमंत्री आले की, या- या घोषणा करायचे त्याची अंमलबजावणीच झाली नाही. अजिंठा चौफुली ते कुसूंबापर्यंत तातडीने सहापदरी रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितले पण त्याचे कसलेच काम झाले नाही. जळगाव ते औरंगाबाद चौपदरी महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार असे सांगितले होते परंतु ते काम रखडलेले आहे उलट प्रवाशांना या महामार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे आणि याचगतीने महामार्गाचे काम चालू राहिले तर अजून किती वर्ष लागतील ते सांगता येणार नाही. जळगाव शहरातून जाणार्याा महामार्ग समांतर रस्त्यांच्याबाबत तर पालकमंत्र्याच्यावतीने जिल्हाधिकार्याांनी आंदोलनकर्त्याला लेखी पत्र दिलेले आहे. तरी सुद्धा अद्याप समांतर रस्त्यांच्या कामाला तसुभरही सुरुवात झाली नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जळगावचे पालकमंत्री होताच काल जिल्ह्याचे दोन्ही खासदारांनी मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. तब्बल साडेपाच ततास चाललेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामावर चर्चा झाली आणि त्या कामांना गती देर्यााचा निर्णय झाला. दोन्ही खासदारांनी या पोटतिडकीने आढावा बैठकीत सहभाग घेऊन सुचना केल्या त्याबद्दल दोन्ही खासदारांचे अभिनंदन केले पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून जळगाव शहरातील महामार्गावरील प्रलंबित असलेला समांतर रस्त्याचे काम येत्या 15 दिवसांत नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते भूमिपुजन करर्याात येणार असल्याचे खा. उन्मेश पाटील यांनी आढावा बैठकीतच जाहीर केले. त्यामुळे या समांतर रस्त्यांसाठी जे जे अडथळे आहेत उदारहरणार्थ विजेचे खांब हलविले, पिण्याच्या पाईप लाईनचे काम करणे, गटारींची व्यवस्था करणे ही सर्व कामे त्या- त्या विभागाने तातडीने कराव्यात अशा सुचना देर्याात आल्या आहेत. त्यामुळे समांतर रस्ता वा शहरातील मामार्गाच्या कामाला सुरुवात होईल याची खात्री जळगावकरांना झाली आहे असे म्हरता येईल. त्यामुळे जळगावकरांसाठी मृत्यूमार्ग बनलेल्या महामार्गावर अनेकांचे निष्पाप बळी गेले. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल यात शंका नाही त्यासाठी आढावा बैठकीत झालेल्या चर्चेची आणि सूचनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ती होईल. अशी अपेक्षा करू या. मागील खासदारांनी तर आठ दिवसात कामाला सुरुवात होईल असे अनेक वेळा आश्वासन दिले परंतु ते आश्वासन मात्र पाळले नाही. तसे व्हायला नको हीच अपेक्षा.

जळगाव जिल्ह्याचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन हे तरूण – तडफदार आहेत. भाजपचे संकटमोचक म्हरूनही ते भूमिका पार पाडताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हावासीयांच्या त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांना मिळालेल्या पालकमंत्रीपदाचा कालावधी अत्यंत तोकडा आहे. या तोकड्या कालावधीत ते कशा प्रकारे आपली छाप पाडतात यावर सर्व काही अवलंबून आहे. परंतु त्यांच्यासाठी या तोकड्या कालावधीच्या पालकमंत्री पदापुढे फार मोठे आव्हान असणार आहे. कारण दोन महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषित होईल. त्यानंतर निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांना प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहेत. जलगाव शहराच्या विकासासंदर्भात गिरीश महाजनांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जळगाव महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी गाळ्याांचा प्रश्न रखडलेला आहे. त्याबाबत त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पाबाबतचा प्रश्न सुद्धा सोडवावा लागणार आहे. जिल्ह्यातील महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाबाबत महाजनांनी पुढाकार घेतलाच आहे. त्यासाठीच्या निधी संदर्भातही त्यांनी घोषणा केली आहे. ही चांगली बाब होय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागर्याापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजनांना अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागणार आहेत. गिरीश महाजनांची कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. त्याचा फायदा जळगाव जिल्ह्यासाठी निश्चितच होईल यात शंका नाही. जळगाव शहर हे एक स्मार्ट शहर बनावे तसेच जळगाव जिल्ह्याचा कायापालट व्हावा ही जळगावसाीयांकडून मात्र अपेक्षा राहील. परंतु प्रशासनामध्ये जी मरगळ आलेली आहे ती मात्र महाजनांना  झटकून काढावी लागणार आहे. समांतर रस्त्यांच्या संदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकार्याांकडून वारंवार दिशाभूल करण्यात आली. डीपीआर मंजूरीसाठी गेलेला असून ते येताच कामाला सुरुवात होईल असे वारंवार सांगून जळगावकरांची बोळवन केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागर्यााआधी काम सुरु होईल असेही सांगितले. आचारसंहिता लागू जाली काम सुरु झाले नाही. त्यावर निवडणुक आयोगाची विशेष परवानगी घेऊन काम करण्यात येईल असे सांगून लोकसभा निवडणूक संपली तरीही कामाचा पत्ता नाही. प्रशासनामुळे सरकार बदनाम होते याकडे गिरीश महाजनांना लक्ष द्यावे लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.