नगरदेवळा पं.स. गणातील विकास कामांसाठी निधीची मागणी

0

पाचोरा (प्रतिनिधी)  : नगरदेवळा पंचायत समिती गणातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी येथील पंचायत समितीच्या सदस्या मंगला पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे केली आहे.

नगर देवळा पंचायत समिती गणातील विविध समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून जि.प. शाळेसाठी कंपाउंड भिंत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे महिला व पुरुष शौचालय , सामाजिक भवन व व्यायाम शाळा, दलित स्मशानभुमी, हिंदू स्मशान भूमी व मुस्लिम कब्रीस्तान येथे हायमास्ट दिवे लावणेबाबत, मौजे चिंचाळे व पिंपळगाव येथे स्मशानभूमी बांधणेबाबत, नगरदेवळा गणातील गावांत ग्रामपंचायत स्तरावर अभ्यासिका केंद्र मंजूर करावे याबाबत लेखी निवेदन दिले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्या मंगला पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.