धुळे तालुक्यातील आत्महत्याग्रस्त विवाहिता व मुलावर पारोळ्यात अंत्यसंस्कार

0

पारोळा – चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून नेहमीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने तीन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंजनाळे ता.जि. धुळे गावी दिनांक ५ रोजी घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू ,सासरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मृत महिलेविरुद्धही खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पारोळा येथील अर्जुन भालेराव पाटील राहणार प्रकाश टॉकीज जवळ पारोळा यांची मुलगी पुनम हिचा विवाह अजनाळे येथील विजय ठाकरे यांच्याशी सन  2014 मध्ये झाले होते .लग्नानंतर पुनमला तिच्या सासरची मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेऊन तसेच वेळोवेळी मारहाण करण्यात येत असल्याने दिनांक ५ रोजी पुनम हिने मुलगा प्रमोद ( ३ ) याच्या सह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती . दरम्यान मयत पुनम व मुलगा प्रमोद यांना पारोळा येथे  दिनांक ६ रोजी दुपारी दिड वाजता येथील प्रकाश टॉकीज जवळील त्यांच्या निवासस्थानी आणून पारोळा येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंतयात्रा काढण्यात आली. पुनम ला मुलगा भावेश ने अग्निडांग दिला तर  प्रमोद यास स्मशानभूमीत दफन करण्यात आले. या घटने मुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

★भावेश पळाला म्हणून वाचला★

सौ पूनमने स्वतासोबत भावेश व प्रमोद यांनाही संपविण्यासाठी सोबत घेतले होते परंतु पूनमने प्रथम प्रमोद यास विहिरीत फेकले त्यानंतर भावेशला फेकणार तोवर भावेशने तेथून पळ काढला ते पाहून पूनमने विहिरीत उडी घेतली त्यात भावेश पळाला म्हणून बचावला असल्याचे त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.