धक्कादायक.. घरात 150 कोटींचे घबाड?; नोटा मोजून आयकर विभागाचे हात दुखले

0

कानपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून जवळपास रोजच छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला.

या छाप्यात व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे घबाड सापडले आहे. या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजण्यासाठी मशीन मागवण्याची वेळ आली होती. शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जातं.

शिखर पान मसालाचे मालक पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली होती. पियुष जैन यांचा परफ्यूमचा व्यवसाय कन्नौजमधून चालतो. कारवाईदरम्यान आयकर विभागाची टीम नोटा मोजण्याचे मशीन घेऊन त्यांच्या घरी पोहोचली.

आधी आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर पथकाला घटनास्थळी नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली. त्यामुळे घराबाहेरील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.