धक्कादायक : कोरोनाचे १६७ संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु

0

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे १४७ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, पंजाबमधील लुधियानात कोरोनाचे १६७ संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील कोरोना संशयित मोठ्या संख्येने बेपत्ता झाल्यामुळे प्रशासनाचीही झोप उडाली आहे. दरम्यान, आता पर्यंत २९ संशयित बेपत्ता झालेले सापडले असून अद्याप १६७ कोरोना संशयितांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतीच परदेश दौर्‍यावरुन परत आलेल्या नागरिकांची यादी देण्यात आली. आता आरोग्य विभाग अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरुन कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना एकाकी ठेवता येईल. शहरातील सिव्हिल सर्जन राजेश कुमार बग्गा यांनी सांगितले की, परदेशातून येणार्‍या लोकांचा शोध घेण्यासाठी दोन टीमची स्थापना केली आहे. 119 जणांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना आतापर्यंत 12 लोक सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या दुसऱ्या टीमला सुमारे 77 जणांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

सिव्हिल सर्जन कुमार म्हणाले, आरोग्य विभागाच्या पथकाला 17 संशयित आढळले आहेत. उर्वरित 167 लोक अद्याप लुधियानामध्ये बेपत्ता आहेत. आतापर्यंत या संशयितांविषयी माहिती न मिळण्याचे एक कारण म्हणजे पासपोर्टमधील चुकीचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक असू शकतो. पत्ते आणि फोन नंबर बदलले आहेत. आमचे कार्यसंघ सक्रिय आहेत आणि त्यांचा शोध घेत आहेत. ते लवकरच सापडतील असं त्यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.