धक्कादायक; ईपीएफओमध्ये 100 कोटींहून अधिकचे स्कॅम

0

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFOमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले होते याप्रकरणी एक मुख्य अधिकारी असलेला आरोप फरार आहे. सर्वसामान्यांच्या भविष्य निधीशी संबधित घोटाळाप्रकरण CBI कडे ट्रान्सफर करण्यात आले आहे. आणि सविस्तर तपास सुरू आहे. तपासादरम्यान 100 कोटींचा घोटाळा असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी ईपीएफओने आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये 8 अधिकाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले होते. EPFOने आपल्या मुंबई रिजनच्या कार्यालयातील कर्मचारी निलंबित केले आहेत.

 नेमके प्रकरण काय?

लॉकडाऊन काळात लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाना EPFOने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली होती. ज्याचा फायदा अधिकाऱ्यांना घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पन्न कमी होणे किंवा नोकरी गेल्यामुळे असंख्य लोकांनी PF मधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता.परंतु त्याचे सेटलमेंट करणे गरजेचे असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या लॉगिन आणि पासवर्ड दुसऱ्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केले. ज्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त सेटलमेंट होऊ शकतील. काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत अनेक खात्यांमधून पैसे गायब केले. असल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.