देशात सलग पाचव्या दिवशी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, पाहा आजची आकडेवारी

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात 78 हजार 524 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 971 रुग्णांचा मृत्यू झाला. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 लोकं आतापर्यंत रिकव्हर झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3% असून 100 टेस्टपैकी आठ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. देशात अजूनही 9 लाख 2 हजार 425 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु सह 10 राज्य अशी आहे जेथे 77% अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. यांपैकी तीन राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ येथे अजूनही 50% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 48% रुग्णांचा मृत्यू हा 8 राज्यांतील 25 जिल्ह्यात झाला आहे. यातील 15 जिल्हे हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. तर, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील प्रत्येकी 2-2 तर पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिलनाळूमधील प्रत्येकी एका-एका जिल्ह्यात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.