देशातील 12 राज्यांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु

0

नवी दिल्ली : देशातील 12 राज्यांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना आजपासून सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे.

आज 1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ही ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची  योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही  योजना अंमलात आणली जाणार आहे, असे रामविलास पासवान यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.