देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली, मात्र मृताच्या आकड्याने चिंता कायम

0

नवी दिल्ली : गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असलेला देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 84,332 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 70 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4002 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

गुरुवारी देशभरात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 7 हजारांनी घट झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,21,311 इतकी आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 11766 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 11766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 8104 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच राज्यातील जिल्हानिहाय कोरोना पॉझिटिव्हिटी रेट काल जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 15.85 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर रत्नागिरी 14.12 टक्के, रायगड 13.33 टक्के, सिंधुदुर्ग 11.89 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.