दुष्काळी स्थितीत कामांना जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांनी मान्यता द्यावी

0

जळगांव-
जिल्हयात यावर्षी अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे पहाणी समितीच्या दुष्काळ सदृषस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनीक पातळीवर चारा छावणी वा अन्य कामांसदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश 22 मार्चच्या शासन निर्णयानुसार जाहिर करण्यात आले आहेत.यासाठी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे.
जिल्हयात दुष्काळी सदृष परीस्थिती घोषित असून जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. चारा टंचाई घेता गरजेनुसार मागणीनुसार टॅकर सुरू करण्यात यावेत, नविन विंधन विहिरींसाठी जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेवून मान्यता द्यावी, मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी हाती घेण्यात आलेली कामे पुर्ण होत असतील तर आवश्यकतेनुसार नविन कामांना मंजुरी देण्यात यावी. या सर्व कामांसाठी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी वा अशासकिय सदस्यांची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही असे 22 मार्च शासननिर्णयानुसार उपसचीव यांनी निर्देशीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.