दुर्दैवी : खामगावात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

0

खामगाव (प्रतिनीधी) : येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा  विद्युत ताराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार ३० मे रोजी सायंकाळी घडली.

शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (22), भुरू घासी पटेल (52), जावेद भूरू पटेल (25), साजेदा बी भूरू पटेल व (50) हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
यातील जावेद याचे ७ जून तर जाकिर याचे ८ जूनला लग्न असून एकाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांव मधील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.