दिल्ली गारठलीः तब्बल १९९ वर्षांचा विक्रम मोडीत

0

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांसाठी सोमवारचा दिवस कडाक्याच्या थंडीचा ठरला. काल दिल्लीमध्ये सरासरी तापमान किमान २.२ तर, कमाल ९.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीत तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. अनेक रेल्वे आणि विमानांचे वेळापत्रक धुक्यामुळे कोलमडले. आणखी काही दिवस दिल्लीकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अगोदरचं प्रदुषणामुळे त्रस्त असणाऱ्या दिल्लीकरांना आता गोठणाऱ्या थंडीने हैराण केले आहे. दिल्लीमध्ये थंडीबरोबर प्रचंड धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे दिल्लीतील रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच दिवसांत दिल्लीतील पालम, सफदरजंग आणि लोधी रोड या परिसरात नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यापकी लोधी रोड भागात सर्वाधिक कमी तापमान होते. २६ ते ३० या पाच दिवसांत लोधी रोड भागात किमान तापमान अनुक्रमे ५.१, ४, १.७, २.८ आणि २.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान १३.८, १५, १३.९, १५.६ आणि ९.३ अंश इतके होते.

दिल्लीतील काही ठिकाणी पारा शून्य अंश सेल्सिअसवर गेला आहे. हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच दाट धुक्यामुळे विमान उड्डाणाला फटका बसला असून अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.