दिलासादायक ! २४ तासांत देशातील बाधित रुग्ण संख्येसह मृतांची संख्याही घटली

0

गेल्या काही महिन्यांपासून लाखांची दिवसागणिक लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तब्बल एक ते दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची इतकी नीच्चांकी नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच गेल्या २४ तासांत मृतांची संख्याही घटली आहे.

नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  सोमवारीही (१२ ऑक्टोबर) करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं होतं. सोमवारी देशात ६६ हजार ७३२ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ८१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.