‘दादा’ येणार सिनेरसिकांच्या भेटीला; सौरव गांगुलीने केली बायोपिकची घोषणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय क्रिकेट जगतातील ‘दादा’ अर्थात माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्या जीवनावर एक चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्यानंतर सौरव गांगुलीचा बायोपिक लवकरच येणार असल्याचे माहिती स्वत: सौरव गांगुली यांनी ट्वीट करत दिली आहे.

हा चित्रपट सौरव गांगुलीच्या करिअरवर आधारित असणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती लव फिल्मसद्वारे करण्यात येणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्वीट करत सांगितले की, क्रिकेटच माझे आयुष्य आहे. मला क्रिकेटनेच आत्मविश्वास दिला आहे. ज्यामुळे आज मी ताठ मानेने जगू शकलो. या चित्रपटाच्या माध्यमातून माझा हा प्रवास उलगडणार आहे. मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, माझा हा प्रवास लव फिल्मस मोठ्या पडद्यावर आणणार आहे.

https://twitter.com/SGanguly99/status/1435860625956081668?s=20

या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहे. चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अगोदर महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनले आहे. सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित एक लघुपट बनला आहे. या शिवाय अनेक खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनले आहे. यामध्ये सानिया नेहवाल, मेरी कोम, मिल्खा सिंह यांचा समावेश आहे. सौरव गांगुलीच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.