‘दांडीबहाद्दर’ मंत्र्यांवर मोदी भडकले! संध्याकाळापर्यंत नावं देण्याचा आदेश

0

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर चांगलेच भडकले असून रोज संध्याकाळी अशा मंत्र्यांची नावं दिली जावीत असा आदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बैठकीत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना संध्याकाळपर्यंत गैरहजर मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यास सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींनी बैठकीला उपस्थित खासदारांनाही सूचना दिल्या. सामाजिक कार्य करा; तसंच आपापल्या मतदारसंघांमध्ये नवीन काहीतरी करून दाखवा. देशातील ११५ मागास जिल्ह्यांमध्ये विकासकामे करण्याची गरज आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

मोदींनी खासदारांना सरकारी कामं आणि योजनांमध्ये तसंच सामाजिक कार्यात स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे असा आग्रह केला. तसंच जेव्हा संसदेचं कामकाज सुरु आहे तेव्हा सभागृहात उपस्थित रहा असंही सांगितलं.

बैठकीला यांची होती उपस्थिती
या बैकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना संबोधित केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.