दसऱ्याच्या मुहूर्तावर SBI ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला बदल

0

मुंबई । देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल करत ग्राहकांना दिलासा दिला आहे.

 

SBI ने यासंबंधी एक ट्वीट करत नव्या नियमांची माहिती दिली आहे. SBI च्या ट्विटनुसार, आतापासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वन टाइम पासवर्ड (OTP) टाकावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नियम आता 24 तासांसाठी लागू करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओटीपी प्रक्रिया आधी रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजल्यापर्यंत सुरू करण्यात आली होती. यामध्ये रक्कम टाकल्यानंतर ओटीपी स्क्रीन उघडेल आणि तिथे तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार करणं शक्य होणार आहे.

 

SBIने का लागू केला नियम?
देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना ऑनलाइन घोटाळेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन नियमानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला एटीएम स्क्रीनवरील रकमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल. ग्राहकांना नोंदणी

Leave A Reply

Your email address will not be published.