त्वचेच्या सौंदर्यासाठी बहुगुणी कोरफड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरफडचे दुसरे नाव घृतकुमारी असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. आयुर्वेदामध्ये कोरफडला अत्यंत महत्व आहे. सौंदर्य तसेच अनेक आजारावर कोरफड उपयुक्त ठरते.  सौंदर्य उत्पादनात कोरफडचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.

चेहऱ्यावरील डाग, काळे वांग आणि पिंपल दूर करून चेहरा गोरा करण्याकरिता अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर केला जातो. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचा चेहरा सुंदर आणि गोरा दिसावा. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती आपआपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. कोरफड ही एक अशी औषधी आहे जी अनेक शारीरिक रोगांना तर दूर करतेच परंतु कोरफडीचा चेहऱ्यासाठी उपयोग देखील करता येतो.

चेहऱ्याला करते मॉइश्चराईज

एलोवेरा अर्थात कोरफड हे एक आयुर्वेदिक मॉइश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेला कोरफड च्या उपयोगाने मॉइश्चराईज करता येते.

– सर्वात आधी कोरफड चे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे.

– आता ह्या जेल मध्ये काही थेंब खोबऱ्याचे तेल टाकावे.

– दररोज रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्यावर हे जेल लावावे. तुम्ही रात्रभर हे जेल लावलेले ठेवू शकतात.

– पिंपलच्या (मुरूम) समस्येत कोरफडचा उपयोग

काळ्या डागांवर उपयुक्त

सर्वात आधी एका वाटीमध्ये कोरफड चा रस घ्यावा. या रसात 1 चमचा लिंबू रस, एक चमचा मध, एक चमचा हळद आणि काही थेंब गुलाब जल टाकावे. आता हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे. यानंतर ह्याला संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावावे. 15-20 मिनिटे पॅक सुकू द्यावा. यानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुऊ शकतात.

सुरकुत्या कमी करण्यासाठी 

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे वय इतरांना कळायला नको व तो नेहमी तरुण दिसावा. परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. ह्या सुरकुत्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. परंतु कोरफड जेल च्या नियमित उपयोगाने आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवू शकतात. यासाठी पुढील पद्धतीने कोरफडचा वापर करावा.

सर्वात आधी कोरफडचे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे. आता ह्या जेल मध्ये जैतूनचे तेल टाकावे व चेहऱ्यावर मास्क प्रमाणे  लावावे. कमीत कमी 30 मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

सर्वात चांगले एलोवेरा जेल कोणते आहे ?

बाजारात अनेक प्रकारचे एलोवेरा जेल विक्रीला उपलब्ध असतात. परंतु आपणास यांच्यापासून पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही. चांगले परिणाम मिळवण्याकरिता नेहमी कोरफडच्या रोपट्याच्या पानाचाच रस वापरावा. यासाठी तुम्ही आपल्या घराच्या बाहेर कुंडीमध्ये एक कोरफड लावून ठेवू शकतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.