तिवसा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेने नगरपंचायत निवडणुकीचा फुंकला बिगुल

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावति जिल्ह्यातील तिवसा येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंधारण मंत्री जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रेचे आयोजन,  करण्यात आले होते.

या परिसंवाद यात्रेमधे  प्रदेशृाध्यक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीची माहिती व समस्या जाणून घेतल्या .व केंद्र सरकार   च्या तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच  पाठिंबा दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले  . यापुढे तिवसा व तालुक्यातील पक्ष संघटनेला बळकट करण्याची ताकद स्थानिक पदाधिकाऱ्यांना देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले .

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी . महिलां संरक्षणाच्या हेतूने राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात आणल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले . महिलां संघटनेच्या बद्दल बोलताना म्हटले की महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे राज्य पवार साहेबांच्या नेतृत्वात देशात अव्वल राज्य म्हणून महाराष्ट्राचे नावं लौकिक झाले असून . महिलांनीअन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे व महिलांनी एकत्र आलं पाहिजे . असे त्यांनी आपल्या  भाषणांमध्ये  सांगितले.

या वेळि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेउन  व युवकांच्या संघटना बांधणी बाबत मार्गदर्शन केले . या परिसंवाद यात्रेला  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभा माजी उपाध्यक्ष शरद दादा तसरे , माजी कृषीमंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख , महिला प्रदेश कार्याध्यक्ष सुरेखाताई ठाकरे , युतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताई सलगर , युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे , विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे , माजी आमदार प्रकाश  गजभिये ,प्रदेश सरचिटणीस संजय खोडके , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयराव भैसे ,  जिल्हा अध्यक्ष सुनील वह्राडे , जिल्हा कार्याध्यक्ष भाष्कर ठाकरे , अनिल ठाकरे ,  निवडणूक पक्ष निरीक्षक प्रकाश नाना बोंडे , महीला जिल्हा अध्यक्ष संगीताताई ठाकरे ,  माजी जिल्हा परिषद सदस्य अजीज पटेल , माजी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील गावंडे  , युवक जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील गावंडे , विधानसभा अध्यक्ष भारत तसरे , प्रदीप राऊत , तालुकाध्यक्ष डॉक्टर सुभाष तंवर , तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर , महिला तालुका अध्यक्ष ऋचा ठाकरे , संगीता ताई विघ्ने , निलीमा सुरटकर , युवक तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे , माजी नगर सेवक भुषन यावले , बाबासाहेब गौरखेडे , मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विलास वावरे , शहर उपाध्यक्ष बच्चू वानखडे , संजय पोल्हाड ,आकाश लांजेवार , अविनाश ठाकरे ,ओबीसी सेलचे अध्यक्ष जगदीश कडगे , सुखदेव दवाळे , मंगेश पोल्हाड , जिल्हा सचिव पुरुषोत्तम दाते , ज्ञानेश्वर तायवाडे , नरेंद्र वाकोडे , दिनेश गंधे , सुशील निमकर , अक्षय ठाकरे , प्रवीण केने , अनिल कडव , अमोल पाटील , मंगेश केने , श्याम इंदोरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते  प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.