तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का?

0

खडसे-मुंडेंवर  ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून टीका

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून भाजपवर हल्ल बोल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता नागपूर तरुण भारत वृत्तपत्राच्या अग्रलेखातून दोघांचे कान टोचण्यात आले आहेत.

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? असा जळजळीत सवाल ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

अहंकारामुळे आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करता येत नाही. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी झाले आहेत. गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’ या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

करण्यात आली आहे. नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, पंकजा मुंडे यांनीही तसंच मन बनवल्याची शक्यता आहे, एका पराभवाने पंकजा आणि एकनाथ खडसे सैरभैर झाले आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते, असेही अग्रलेखात  म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.