.. तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिकेची संधी द्यावी – आ. गिरीश महाजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर येथे ‘हलगट; या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजितदादा पवार, सुधीर मुनगट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. तीस वर्षे आमदारकीची झाली आहे. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही. आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्यावी. अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मात्याकडे केली.

यावर बोलतांना चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे गंमतीत म्हणाले, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन या वेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.