तडवी द गाईड, भुसावळचा स्तुत्य उपक्रम

0

 भुसावळ | प्रतिनिधी  

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असतांना प्रत्येक जण या पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय, पोलिस आणि शासकिय यंत्रणेतील प्रत्येक  घटक जिवाचे रान करून अहोरात्र सेवा देण्यात गुंतलेला आहे. सामान्य नागरिकही सरकारी आदेशांचे तंतोतंत पालन करत आहे.उपचाराकरीता

रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा मानस मनात ठेवून भुसावळ शहरातील तडवी द गाईड संस्थेच्या सभासदांनी रक्तपेढीत गर्दी न करता दिवसभरात क्रमाक्रमाने जावून स्वैच्छिक रक्तदान केले व  हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला .तसेच  इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी डाॅ सलीम बशीर तडवी, किरण जहाबाज तडवी, अकिल साहेबू तडवी, असलम गुलामदस्तगीर तडवी, हैदर उस्मान तडवी, मनोहर झांबरे, संदीप काकडे, सोनू खलील तडवी, आरिफ हुसेन तडवी, शरिफ भिकारी तडवी आणि अशफाक जरदार तडवी यांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांना कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्यावी याकरीता मनोज अल्लाउद्दीन तडवी, सलमान इतबार तडवी आणि धन्वंतरी ब्लड बँकेच्या कर्मचारी वर्गाने मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.