तंत्रज्ञानाच्या युगात भगवान महावीरांच्या मानवतावादी विचारांची गरज

0

नाटिकांमधून उलगडले भगवान महावीरांचे जीवनदर्शन
जळगाव | प्रतिनिधी
सत्य, अहिंसा तत्वांचा अखिल मानव जातीला आदर्शाचा संदेश देणारे भगवान महावीर आहेत. भगवान महावीर त्यांचा 2618 वा जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या जन्मकल्याणक महोत्सवात दि. 16 एप्रिल 2019 रोजी सकाळी 9 वाजता गौमाता को लापसी अर्पण नूतन भावना मंडल यांच्या वतीने पांजरापोळ गोशाळेत संपन्न झाला. यावेळी दलूभाऊ जैन, दिलीपभाऊ गांधी, धनपती मोमाया, राघवजी सत्रा या मान्यवरांच्या हस्ते गोमातेला लापसी अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांसमवेत मोठ्या संख्येने जैन पुरूष व महिलामंडळ, सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती जळगाव तसेच समाजबांधव उपस्थित होते.
संध्याकाळी 5 ते 6 यावेळेत कांताई सभागृहात मै अपने भाग्यका निर्माता (युवक व युवतींसाठी) श्रीमती जयश्रीजी डागा कोलकत्ता यांनी संबोधले. त्या आपल्या जीवनाचे महत्त्व प्रकट करतांना म्हणाल्या की, आपण  स्वत:च आपल्या भाग्याचे निर्माते असून आपले ध्येय गाठण्यासाठी उपलब्ध पर्यायातून योग्य पर्याय निवडायला हवा. यासह तंत्रज्ञानाच्या युगातील अनेक गोष्टीची आपल्या जीवनात सांगड घालण्या संदर्भात मार्गदर्शक बाबीवर प्रकाशझोत टाकला. यावेळी लूक अ‍ॅण्ड लर्न चे श्री.श्रेयस कुमट, सौ.रीमाजी कुमट, श्री.सुभाषजी सांखला व श्री.नितीनजी चोपडा हे मान्यवर उपस्थित होते.
यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे 7 वाजता शंकरलालजी कांकरीया, राजेशजी ललवाणी, ज्योती जैन, निशा जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी  मेरे महावीर या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर भगवान महावीर चरित्र नाटीका जळगावातील सर्व मंडलांच्या वतीने सादर करण्यात आली. यात भगवान महावीर यांचे जीवन दर्शन, सिध्दांत व आजचे विज्ञान या विषयावर हे सादरीकरणात महावीरांचे सिध्दांत आजच्या विज्ञान युगात खुप काही महत्त्व सांगणारे असून त्यांच्या जीवन चरित्रातून अशा अभूतपूर्व घटना आम्ही खुप सार्‍या घेवू शकतो फक्त मनात अध्ययनाची जोड असल्यास ते जीवनात आम्ही आत्मसात करू शकतो असा संदेश देत नव पिढीला प्रेरणाही देतांना आजच्या नाटीकेतून खुपकाही महत्त्वाचा विषय व गोडी मनाला स्फुर्ती देवून गेली. यावेळी  यावेळी आयोजन समितीच्या वतीने मानवतावादी व प्रेरक विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवात मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.