डॉ. पी. एस. लोहार यांची रशियन विद्यापीठास भेट

0

 

चोपडा- दि. 7
सोव्हिएत रशियात 1755 साली स्थापित लोमोनोसॉव मस्को स्टेट विद्यापीठाच्या जीवशास्त्र व पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया (रुडन) येथील जैवतंत्रज्ञान विभागात विद्यार्थ्यांना उदबोधित शृंखलेत महात्मा गांधीं शिक्षण मंडळ चोपडा संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान व प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ पी एस लोहार यांनी यशस्वीपणे सहभाग नोंदवून संस्थेचा सन्मान वाढविला. तसेच त्यांनी इन्स्टिटयूट ऑफ ओरिएंटल मेडिशिन या संस्थेला भेट देऊन तेथील औषधी वनस्पतींच्या जैविक घटकाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून मानवाच्या असाध्य रोगावरील औषधी उपचार पद्धती जाणून घेतल्या.
लोमोनोसॉव मस्को स्टेट विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे प्रमुख डॉ एनद्रो क्रीस्टो व जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा लिओनिड कोरझुन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ लोहार यांनी प्राण्यांच्या वर्गीकरणात जैवमाहीतीशास्त्राचे महत्व या विषयावर आधारित सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केले. तसेच पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया (रुडन) येथील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना मानवाच्या यकृत पेशी श्रुंखलेत कर्करोगाचे प्रमाण शोधण्यासाठी बायोमार्करचा उपयोग या विषयी द्रुकश्राव्य पद्धतीचा वापर करून सादरीकरण केले. आपल्या विषयातील ज्ञान सतत अद्ययावत केल्याचा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापकांच्या संपर्कात राहिल्याने प्रा डॉ लोहार यांना ही संधी उपलब्ध झाली.
प्रा डॉ लोहार यांना मे 2019 मध्ये मोस्को विद्यापीठात आयोजित होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदचे सहसंयोजक म्हणून सांमजस्य कराराद्वारे आमंत्रित केले गेले आहे. अशी कामगिरी बजावणारे केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी निगडित व महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा येथील एकमेव प्राध्यापक आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. नियोजीत परिषदेत 50 भारतीय प्राध्यापक व संशोधक विद्यार्थीना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा डॉ लोहार यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्दोगपती तथा ओरिएंटल मेडिसीन संस्थेचे अध्यक्ष डॉ जे सिंग राघव, रुडन विद्यापीठाचे संचालक डॉ दतन नायर व रशियासतील भारतीय दूतावासाच्या अप्पर सचिव वृंदा गोहिल यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रा डॉ लोहार यांचा रशियातील अभ्यास दौरा यशस्वी करणेसाठी नवसारीचे भरतभाई नथ्थुभाई लोहार यांचे रशियात स्थाईक सुपुत्र मालव लोहार यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
प्रा डॉ लोहार यांच्या अश्या सातत्त्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक गुणांकन वाढण्यास व राष्ट्रीय नैक प्रणाली तसेच राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियान(रुसा) अंतर्गत मानांकन उंचावण्यात मदत होत आहे. संस्थेचे संथापक डॉ सुरेश जी पाटील, अध्यक्ष ऍड संदीप पाटील, सचिव डॉ स्मिता पाटील व प्राचार्य डॉ डी ए सूर्यवंशी यांनी प्रा डॉ लोहार यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.