डॉ उल्हास पाटील रूग्णालयातर्फे कारागृहातील ६० कैदयाची तपासणी

0

जळगाव — जळगाव जिल्हा कारागृह तसेच डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सयुक्त विद्यमाने आज २३ रोजी ६० कैदयाची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.

आज जळगाव जिल्हा कारागृहात डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान उपचार शिबिर आयोजीत करण्यात आले. यावेळी आर आर पाटील निरिक्षक रूग्णालय, निरिक्षक आर डी पाटील, जिल्हा कारागृह अधिक्षक तायडे, रावसाहेब, यांच्या उपस्थीतीत डॉ उल्हास पाटील रूग्णालयाचे डॉ एस डी बडगूजर,डॉ मुकेश चौधरी, डॉ शर्मा यांनी ६० कैदयाची तपासणी केली. यातील ३ कैदयाना पुढील उपचाराची आवश्यकता असल्याने सामान्य रूग्णालय जळगाव येथे पाठवण्याचा सल्ला दिला असून ज्या कैदी रूग्णांना गरज होती त्यांना मोफत औषधी व पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला.

सहायक धर्मदाय आयुक्त तळेगावकर आणि माजी खा.डॉ उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर आयोजीत करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कारागृह व डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.