डॉक्टरांचा संप चिघळला ; पश्चिम बंगालमध्ये 700 डॉक्टरांचे राजीनामे

0

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमधील दोन कनिष्ठ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता जोर पकडला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतरही पश्चिम बंगाल सरकारकडून कोणत्याही कारवाईचे ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत तब्बल 700 सरकारी डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत.

दरम्यान १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याची अटच डॉक्टरांनी ठेवली आहे. तर दुसरीकडे एम्समधील डॉक्टरांच्या संघटनेनेही ममता बॅनर्जी यांना अल्टीमेटम दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 700 सरकारी डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत.

दिल्लीतील या हॉस्पिटलमधील डॉक्टर होणार संपात सहभागी
एम्स, सफदरजंग हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हिंदूराव हॉस्पिटल, बीएमएच दिल्ली, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल, संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड असोसिएटेड हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड अलाइड सायन्स, श्री दादा देव मातृ अँड शिशू चिकित्सालय, नॉर्दन रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, चाचा नेहरू बाल चिकित्सालय, गुरू तेग बहादूर हॉस्पिटल आणि गुरू गोविंद सिंग हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत.  आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.